Nationalist in an effort to recover : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभाराहील आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबाने निर्णायक पाऊल उचलत पक्षातील नेतृत्वाचे औपचारिक पुनर्रचनेचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची धुरा आता एका व्यक्तीकडे न ठेवता तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर विभागण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटना सुदृढ ठेवणे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणे आणि राजकीय स्थेर्य टिकवून ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश मानला जात आहे.
पक्षातील नव्या सत्ताकेंद्रांमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्यस्तरीय नेतृत्वाची सूत्रे देण्यात आली असून, त्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष या दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. राज्यभर दौरे, कार्यकर्त्यांशी संवाद आणि अजित पवारांनी उभारलेला जनसंपर्काचा पाया मजबूत ठेवणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असेल.
SBI महाराष्ट्राचे मुख्यालय आता पुण्यात; वाढती आर्थिक ताकद पाहता बँकेचा मोठा निर्णय
दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही राजकीय केंद्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र सरकारसोबत समन्वय, राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातील उपस्थिती आणि महायुतीतील संतुलन राखणे या भूमिका ते पार पाडणार आहेत. तर बारामतीसह पुणे ग्रामीण भागाची जबाबदारी जय पवार यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात संघटना मजबूत ठेवणे, स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि विकासकामांची गती कायम ठेवणे हे त्यांच्या समोरील प्रमुख आव्हान असेल.
एकूणच, अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पवार कुटुंब एकत्र येत नेतृत्वाचे ‘पॉवर डिस्ट्रिब्यूशन’ मॉडेल स्वीकारताना दिसत आहे. यामुळे पक्षातील शिस्त कायम राहण्यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये स्थैर्य निर्माण होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
