Navid Mushrif son of Cabinet Minister Hasan Mushrif defeated by 69 votes in Gokul election : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीत बदललेल्या कलामुळे महायुतीची चिंता वाढली असून, सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या महायुतीला नंतरच्या मतमोजणीत पिछाडीवर जावं लागलं आहे. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफांना मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे त्यांचे पुत्र नविद मुश्रीफांचा देखील 69 मतांनी पराभव झाला आहे.
गोकुळमध्ये सतेज पाटील बाजी मारणार? महायुतीचं टेन्शन वाढलं, निकालात मोठी उलथापालथ
सध्याच्या कलानुसार, समविचारी आघाडीचे 14 उमेदवार आघाडीवर असून महायुतीचे 11 उमेदवार पुढे आहेत. गोकुळच्या 25 जागांपैकी बहुमतासाठी 14 जागांची गरज असल्याने सतेज पाटील यांच्या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.मतमोजणीच्या सुरुवातीला महायुतीचं पारडं जड असल्याचं चित्र होतं. सर्वसाधारण गटातील जागांवर महायुतीचे उमेदवार पुढे होते, तर आरक्षित जागांवर समविचारी आघाडीला आघाडी मिळत होती.
A Perfect Murder मधून पहिल्यांदाच साकारणार रुपाली भोसले सस्पेन्स-थ्रिलर भूमिका
मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये मतांचं चित्र बदललं आणि सतेज पाटील यांच्या आघाडीनं आघाडी घेतली. त्यामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण डेंगळे, विश्वास पाटील आणि हे पिछाडीवर असल्याचं सध्याच्या कलातून दिसत आहे. तर कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा गोकुळ निवडणुकीत 69 मतांनी पराभव.
