Download App

Navneet Rana संतापल्या.. म्हणाल्या, कोण सुषमा अंधारे ? मी ओळखत नाही; पहा, काय घडले ?

Navneet Rana : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपलेली असताना त्यातच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यातही शाब्दिक युद्ध सुरू आहे. अंधारे यांनी काल अमरावतीत (Amravati) खासदार नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रावरून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देत राणा म्हणाल्या, की मी अंधारे यांना ओळखत नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नाही.

खासदार राणा यांनी खोटी जात प्रमाणपत्र देऊन खासदारकी मिळवली असा आरोप अंधारे यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राणा म्हणाल्या, की प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्यासाठी मी नाही. लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे आम्ही उत्तर किंवा प्रत्युत्तर करणार नाही.आम्हाला असे वाटते की आम्ही आमची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहोत. आणि जी गोष्ट न्यायालयात आहे ते कोर्ट पाहिल. मला नाही वाटत त्या न्यायाधीश बनल्या आहेत. ज्यावेळी बनतील त्यावेळी पाहू, असे त्यांनी सांगितले.

हे वाचा : Navneet Rana : भोलेनाथाने उद्धव ठाकरेंना चांगलाच प्रसाद दिला

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गट व भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर त्यांनी राणा यांनाही टार्गेट केले आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर आधीच अडचणीत आलेल्या आहेत. विरोधकांनी त्याच मुद्द्यावर राणा यांची कोंडी केली आहे. विरोधकांकडून रणनितीसह राणांवर टीका केली जात आहे. अंधारे यांनीही याच मुद्द्यावर नवनीत राणा यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी केलेल्या टीकेला राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

 

 

Tags

follow us