Download App

धमकीनं आवाज बंद करणार असाल तर गैरसमज : शरद पवार

Sharad Pawar On Death Threat :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर आता या सर्व प्रकरणावर शरद  पवारांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी धमकीची चिंता नसल्याचे म्हटले आहे.

पवार म्हणाले की, ज्यांचा हातात राज्याची सूत्रं आहेत त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. मत व्यक्त करण्याचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असं असताना कुणाला धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असे वाटत असेल तर हा त्यांचा  गैरसमज आहे, असे ते म्हणाले.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्राचे पोलीस दल सक्षम असून त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी यासंबंधी काळजी घ्यावी, असे पवारांनी म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी आल्याने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्त यांची भेट घेत तक्रार दाखल केली.

‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात

जर काही झालं तर त्याला फक्त देशाचं व राज्याचं गृहखातं जबाबदार असेल असे सुळे म्हणाल्या. काही बरंवाईट झालं तर केंद्रीय गृहखातं जबाबदार असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. महिला व मुलींच्याबाबतीत अधिकच धोकादायक स्थिती झाली आहे. त्यामुळे अमित शाहांना माझी विनंती आहे की, त्यांनी तात्काळ राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मी विनंती करते, असे त्या म्हणाल्या.

 

 

 

Tags

follow us