Supiryea Sule On Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी आज आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली असून याविषयी धक्कादायक खुलासे केले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
“मी रविवारी अजित पवारांना भेटले होते. आमच्यात बराचवेळ चर्चा झाली. त्यानंतर पक्षाचे आमदार तिथे दादाला भेटायला आले. मला वाटलं निवडणुकीची तयारी कशी करायची याची चर्चा करायला आले असावेत. दादाच्या मनात काय चाललं आहे मला ठाऊक नव्हतं. मी तिथून निघाल्यानंतर त्याच्याकडे आलेले समर्थक आमदार आणि दादा हे राजभवनावर पोहोचले”.
राष्ट्रवादीत वादंग! फोटोच्या मुद्द्यावरुन अमोल मिटकरी थेट आव्हाडांनाच खेटले…
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, देवगिरी बंगल्यावर मी जेव्हा अजित पवारांना भेटले तेव्हा आमची एका विषयावर चर्चाही झाली. काही दिवसांपूर्वीच अजितदादांनी विरोधी पक्षनेते पद मला नको मला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आम्ही जेव्हा बोललो तेव्हा पुढे काय होणार याची मला अजिबात कल्पना नव्हती.
अजित पवारांच्या मागे शरद पवार आहेत का?
अजित पवारांनी शरद पवारांना सांगूनच या गोष्टी केल्या आहेत का असा प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की, अजित पवारांच्या निर्णयाची शरद पवारांना काहीही कल्पना नव्हती. त्यांना पुसटशी कल्पना असती तर त्यांनी पक्ष उभा करण्याची मोहिम सुरु केली नसती. बंड केलेल्या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात कारवाई सुरु केली नसती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब, ‘त्या’ पत्राबद्दल पवारांच्या खास माणसाने केला खळबळजनक खुलासा…
अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केल्याने आपण निराश झालो असून शरद पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय झाला असल्याचे सुळे म्हणाल्या. दोन दिवसांपूर्वीच सुनील शेळकेंनी हा दावा केला होता की, सुप्रिया सुळेंसमोरच या गोष्टी ठरल्या होत्या.