NCP Jitendra Awhad Criticized Mahayuti On Walmik Karad : सध्या मस्साजोग प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) चांगलाच चर्चेत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) महायुती सरकारवर निशाणा साधलाय. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं कराडला आयसीयुमध्ये स्पेशल ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप केला जातोय. सोशल मीडियाच्या X प्लॅटफॉर्मवर त्यांनी पोस्ट करत सरकारवर टीका केलीय.
मोठी बातमी! उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता कायदा लागू, होणार ‘हे’ बदल
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हॉस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले (Jitendra Awhad Criticized Mahayuti) आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मिक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो.
हाॅस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मिक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 27, 2025
बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असं कधी बघितलेलं नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत. अर्थात, तो वाल्मिक कराड आहे. वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, असा टोला त्यांनी लगावला आहे. थोडी तरी लाज बाळगा, असं ते म्हणालेत.
पठाण अन् फायटर; सिद्धार्थ आनंदने प्रजासत्ताकदिनी घातला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आलीय. कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा देखील करण्यात आलाय. वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीच्या पथकाला शरण आला होता. त्यानंतर त्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे त्याला स्पेशल ट्रिटमेंट मिळतेय, असा आरोप विरोधक करत आहेत.