Download App

मला कोणतीही क्लीनचीट मिळालेली नाही; अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On State Co-operative Bank Scam :  महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आज अजित पवारांनी क्लीनचीट मिळाली अशी माहिती समोर आली होती. त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आज आलेल्या त्या बातमीत काहीही तथ्य नाही. चौकशी सुरू आहे. कुठलीही क्लीनचीट मिळालेली नाही. कशाच्या आधारे बातमी देण्यात आली माहीत नाही असा स्पष्ट खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला आहे.

शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…

तसेच गारपीटीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीट जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे.या संदर्भात आज भेट घेतली असे अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी नाना पटोलेंवर देखील भाष्य केले. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का अशी वक्तव्य करतात. त्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर निर्माण होवू शकते. पण त्या गोष्टी मीडियापर्यंत जाण्याऐवजी त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उध्दव ठाकरे यांच्याशी बोलावे. यातून मार्ग निघू शकतो. टाळी एका बाजूने वाजत नाही ना. अशाप्रकारच्या बातम्या आल्या की महाराष्ट्रात काम करणारा जो कार्यकर्ता आहे (त्या- त्या पक्षाचा) तोही संभ्रमात पडतो. त्यामुळे अशा गोष्टी बंद केल्या पाहिजेत. महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळी या गोष्टी मांडणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा

कॉंग्रेसअंतर्गत जो विषय त्यासंदर्भात मी बोलू इच्छित नाही. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी – त्यांनी आपल्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आपापल्या स्तरावर सोडवावे. आम्हाला सुचना करण्याचा अधिकार नाही आणि नाक खुपसायचाही अधिकार नाही. मात्र आघाडी टिकावी असे वाटते असेही मत अजित पवार यांनी मांडले.

 

Tags

follow us