Download App

Video : देश का नेता कैसा हो…; अजितदादांच्या एंट्रीला जोरदार घोषणाबाजी

NCP Leader Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय  होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची शरद पवारांनी घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या नेत्यांची नावे आहेत. या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती  पवारांनी दिली आहे.

जेव्हा मी सांगतो पुन्हा येईन….; फडणवीसांच्या विधानाने चर्चांना उधाण

यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार, याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहेत. त्यात आता शरद पवारांकडून अध्यक्षपदासाठी दोन नावे समोर आल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक नेते, उद्योजक यांचे त्यांना फोन आल्याची माहिती आहे. पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास, त्यांच्याकडून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर अजित पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आले असताना कार्यकर्त्यांनी देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. अजित पवारांनी याकडे लक्ष न देता ते आतमध्ये निघून गेले. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवण्याचा पवारांचा प्लान? मित्राकडूनच मोठा दावा

Tags

follow us