Download App

राज्यातील गायब होणाऱ्या मुलींवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या सरकारला काही…

Supriya Sule :  राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की, नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीतील आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का?, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

Rupali Chakankar : धक्कादायक! राज्यात मुली सुरक्षित नाहीत, दररोज 70 मुली होतात बेपत्ता

तसेच याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत राज्यातील गायब होणाऱ्या मुलींच्या संदर्भात माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रातून जानेवारी महिन्यात 1600 मुली गायब झाल्या. फेब्रुवारी महिन्यात 1810 मुली गायब झाल्या. तर एप्रिल महिन्यात 1810 मुली गायब झाल्या. तर मुली गायब होण्यात 2020 पासून राज्याचा पहिला क्रमांक झाला आहे. यावर राज्यातील यंत्रणांचा वापर होताना दिसत नाहीय. तर महिला आयोगाच्या वतीने गेल्या 16 महिन्यांपासून याचा पाठपुरावा सुरू आहे.’

boat Accident : केरळमध्ये भयावह दुर्घटना, पर्यटकांची नाव उलटून 21 जणांचा मृत्यू

Tags

follow us