Bageshwar Dham : मुंबईत कार्यक्रमाला विरोध पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते बाबांच्या भेटीला

Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत आले आहेत. मात्र त्यांच्या मुंबईमधील कार्यक्रमाला मोठा विरोध झाला आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनेही धीरेंद्र […]

umesh patil ncp

umesh patil ncp

Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत आले आहेत. मात्र त्यांच्या मुंबईमधील कार्यक्रमाला मोठा विरोध झाला आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे.

काँग्रेसनेही धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्य़क्रमाला विरोध दर्शवला आहे. मनसे नेते संदीप राणे यांनीही हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली आहे. या कार्यक्रमाला वाढत असलेला विरोध पाहता वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

धीरेंद्र शास्त्रींचा आज मुंबईत दरबार; मनसे-काँग्रेसचा विरोध, अंनिसने केली तक्रार दाखल

काँग्रेसचा विरोध, पण…

बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच कॉंग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. शुक्रवारी मीरा रोड पोलीस ठाण्यात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लेखी तक्रार ही दाखल केली आहे. या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास तर बागेश्वर धाम सरकारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याला विरोध केला आहे. नाना पटोले यांनी बागेश्वर धाम यांना कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीने देखील या मागणीला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाना पटोले यांच्या मागणीला पाठिंबा देत विरोध केला होता पण राष्ट्रवादीचे उमेश पाटील हे मात्र बाबांच्या दर्शनाला गेलेले दिसले.

सोशल मीडियावर या फोटोवर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. “ईकड पक्षाने आवाज उठवायचा…तिकड….” अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या आहेत. एकीकडे पक्षाकडून विरोध केला जात असताना पक्षाचे नेते दर्शनाला जात असल्याचे राष्ट्रवादीची कोंडी झाली आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भोंदू बाबा बागेश्वरचा कार्यक्रम वारकऱ्यांचा विरोध असतानाही यांनी आयोजित केला गेला. कार्यक्रमातून अंधश्रद्धेचा प्रसार होईलच. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या अवमान करणारी ही कृप्रवृत्ती जाणीवपुर्वक महाराष्ट्रात आणली. आयोजक आमदारांसह समितीवर गुन्हा दाखल व्हावा.”

देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो शिर्डीमध्ये

Exit mobile version