मोदींच्या मांडणीने खासदारही थक्क होतात; पाठ थोपटत पवारांनी अखेर संधी साधली

शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा […]

Letsupp Image   2024 01 04T164913.985

Letsupp Image 2024 01 04T164913.985

शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा दावाही पवारांनी केला. मोदींनी सत्तेत आल्यानंतर केलेल्या मोठ मोठ्या घोषणा फसव्या असल्याचे देशवासियांना लक्षात येऊ लागले आहे. सत्तेत आल्यानंतर मोदींनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात तसं झालं नाही. शहरी भागातील लोकांना घरे देऊ परंतु ते देखील झालं नसल्याचे पवार म्हणाले. ते शिर्डीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबीरात मार्गदर्शन करताना बोलत होते.

‘दिल्लीश्वरांनी डोळे वटारले की ते घाबरतात’; सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका

‘हम सपने नहीं हकिगत बुंदते हैं, इसी लिए हम मोदी को चुनते हैं!’ असे म्हणत भाजपकडून मोदींच्या गॅरेंटीवर जोर दिला जात आहे. मात्र, मोदींची गॅरेंटी खरी नसल्याचा थेट हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरेंटी खरी नसून, ते गॅरेंटी गॅरेंटी म्हणतात मात्र, त्यांची ही गॅरेंटी पूर्णपणे खोटी आहे. मोदी केवळ आणि केवळ घोषणा करतात असा थेट आरोप पवारांनी केला आहे. मोदींच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचेही ते म्हणाले. देशातील तरूण पिढी अस्वस्थ असून, देशवासियांना पक्की घरं देणारं ही मोदींची घोषणा हवेत विरल्याचे पवार म्हणाले.

अखेर रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी वर्णी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धडकी

घरांबाबतच्या फसव्या घोषणेबरोबरच मोदींनी अर्थव्यवस्थेबाबतही फसव्या निघाल्या असून, 5 लाख कोटींच्या अर्ध्यावरही देशाची अर्थव्यवस्था पोहचलेली नसून, देशात अन्नधान्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी बघता भाजपनं अनेकांचा विश्वास कमावण्यापेक्षा त्यांची फसवणूक करण्याचे काम केले असून, मोदींनी वेळोवेळी दिलेली गॅरेंटी खोटी असल्याचा प्रत्यय अनेकांना आला असल्याचेही यावेळी पवारांनी सांगितले.

Exit mobile version