Download App

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का? शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर करीत जयंत पाटलांचा सवाल

Jayant Patil : पावसाने हिरामोड केल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. मराठवाड्यासह काही भागांतील शेतकऱ्यांवर थेट अवयवच विकण्याची वेळी आल्याचं समोर आलं. हिंगोलीतल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना निवेदन पाठवत अवयव विकत घेण्याची विनंतीच केली आहे. निवदेनात शेतकऱ्यांनी अवयवांचे दरही पाठवले आहेत. या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्यांने कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. या शेतकऱ्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी शेअर करीत सरकारला जाब विचारला आहे.

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? शरद पवार अन् अजितदादांसाठी आजचा दिवस महत्वाचा

जयंत पाटील पोस्टमध्ये म्हणाले, “हिंगोलीतील शेतकरी राजकुमार नायक यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. इतकेच नव्हे तर असंख्य अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांनी आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे निवेदनदेखील मुख्यमंत्र्यांना या कवितेतून दिले आहे. राजकुमार यांची ही कविता प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात या कवितेतून काही प्रकाश पडेल का हा खरा प्रश्न आहे.” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महुआ मोईत्रा प्रकरण शेकलं, खासदारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, पोर्टलचा वापर फक्त खासदारच करणार

यंदाच्या मान्सूनमध्ये काही भागांत जास्त तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने म्हणावं तशी पिके आली नसल्याची परिस्थिती आहे. जे पीक आले आहेत, त्या पिकांच्या पैशांतून घेतलेलं पीक कर्जसुद्धा फेडणं शक्य नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. हिंगोली जिल्ह्यातील 10 कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपले अवयव विकायला काढले आहेत. अवयवाच्या दराबाबत एक पत्रचं शेतकऱ्यांनी सरकारला धाडलं आहे. आमचे अवयव विकत घेण्याची मागणी कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केली आहे.

अर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी विरोधकांनीही सरकारला चांगलचं सुनावलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सडकून टीका करीत सरकारला जाब विचारला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांच्या अवस्थेवर संताप व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, कर्जाच्या डोंगराखाली दबलेला शेतकरी किती चिंतेत आहे याचे भान सरकारला नाही. आमदारांना खोके दिले जातात पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाला पुरेसा पाऊस न मिळाल्याने हातचे पिके गेली आहे. जे पिकं हातात आली आहेत त्यातून लागवडीचा खर्चही भागणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थिती लागवडीसाठी घेतलेलं पीककर्ज कसं फेडायचं? हा सवाल आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अशातच सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांनी कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी अवयव विकायला काढले आहेत. एकूण या परिस्थितीवरुन सरकारच्या डोक्याता आता तरी प्रकाश पडणार का? असा सवाल जयंत पाटलांनी केला आहे.

Tags

follow us