New Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) पाहणी हवाई पाहणी केली. तसेच या कामाची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम तसेच इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच या विमानतळाच्या जागेची हवाई पाहणी करून धावपट्टीचे काम कितपत झाले आहे हेदेखील जाणून घेतले. (New Mumbai Airport work Inspection by CM Eknath Shinde and DCM Devendra Fadanvis )
Devendra Fadnavis : मुहूर्त निघाला अन् फडणवीसांनी शिवतीर्थ गाठलं; ‘राज’ भेटीत रंगला गप्पांचा फड
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नवी मुंबई विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावे. यासाठी शासन प्रयत्नशील असून त्याच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. तसेच शिवडी-न्हावा शेवा सी लिंक, मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील मिसिंग लिंक, मुंबईतील मेट्रो मार्ग यांना प्राधान्य देण्यात येत असून ते लवकरात लवकर पूर्ण होतील. अंदाजे 9 कोटी नागरिक या विमानतळावरून दरवर्षी प्रवास करतील असा प्राथमिक अंदाज आहे, . असेही शिंदे म्हणाले.
Modi Government : मोदी सरकारकडून छ. शिवाजी महाराजांचा सन्मान; राज्याभिषेक दिनी नवीन टपाल तिकीट
अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी हे विमानतळ वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या मार्च एप्रिल 2024 पर्यंत ते पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. यावेळी उद्योग तथा रायगड जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे देखील उपस्थित होते.
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार विस्तार…
या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. तसेच त्याचबरोबर त्यांनी यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाविषयी आपली इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पंतप्रधान मोदींच्या हस्ते याचं भूमिपूजन झालं. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं. त्याचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. तशाच प्रकारचा हा महत्त्वकांशी प्रकल्प असून आमची अपेक्षा असीच आहे याचं देखील उद्घाटन देखील आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं पाहिजे.