Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या दृष्टीनेच उद्या आणखी एका राजकीय पक्षाचा जन्म होत आहे. बंजारा समाज (Banjara Samaj) आणि राजकारण याला केंद्रस्थानी मानून बंजारा बेस असलेल्या ‘समनक’ (Samanak Party) या नव्या पक्षाची स्थापना होणार आहे.
उद्या नांदेड (Nanded) जिल्ह्यातील माहूर येथे एका मोठ्या कार्यक्रमात ‘समनक’ पक्षाच्या स्थापनेची घोषणा होणार आहे. यावेळी एक जाहीर सभा देखील होणार आहे. बंजारा समाजाला राजकारणात समान वाटा देण्याचा पॉलिटिकल अजेंडा या पक्षाच्या माध्यमातून राबविला जाणार आहे.
Sharad Pawar… आता सुप्रिया सुळे नॉट रिचेबल आहेत का?
बंजारा समाजासाठी काम करीत असलेल्या गोरसेना या संघटनेचंच या नव्या राजकीय पक्षात रुपांतर होत आहे. या संघटनेचे संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नवा पक्ष आकाराला येणार आहे. संघटनेचे नांदेडमध्ये दिवंगत नेते कांशीराम नायक यांनी सर्वात आधी ही संकल्पना मांडली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून पक्ष स्थापनेसाठी अतिशय गोपनीयपणे कास सुरु होतं. यासाठी संदेश चव्हाण यांनी राज्य आणि देशातील हजारो बंजारा तांड्यावर बैठकी घेतल्या होत्या.
शिवसेना नेते संजय राठोड यांना बंजारा समाजाचे नेते मानले जाते. गेल्या काही दिवसांपासून संजय राठोड यांच्यानिमित्ताने बंजारा समाज राज्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे. बंजारा समाजाची काशी समजले जाणारे पोहरादेवी देवस्थान देखील चर्चेत असते. समनक पक्षांच्या निर्मीतीमध्ये शिवसेना नेते संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक आणि भाजप आमदार निलय नाईक यांचे योगदान असल्याचे बोलले जात आहे.