Download App

News Area India Survey : श्रीकांत शिंदेंची फिल्डिंग फेल जाणार? प्रणिती शिंदे चौथ्यांदा गाठणार विधानसभा

Assembly Election Survey: न्यूज एरेना इंडिया या संस्थेने सर्व्हे केला असून राज्यात 2024च्या विधानसभेत भाजपला बहुमत दाखवले आहे. या कंपनीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अंदाज व्यक्त करत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. याच कंपनीने आता महाराष्ट्रातील मतदार संघ निहाय सर्वेक्षण जाहीर केले आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. (Solapur Poltical) राज्यातील आगामी 2024 च्या विधानसभा दृष्टीने अनेक अंदाज वर्तवले जात आहे. या अगोदर सकाळ वृत्त समूह आणि झी वृत्त समूह यांनी एक सर्व्हे प्रदर्शित केला होता. न्यूज एरेना इंडियाच्या सर्व्हेमध्ये भाजपला राज्यभरात 123 ते 129 सीट, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 50-56 जागा, काँग्रेसला 50-53 जागा, ठाकरे गटाला 17-19 जागा आणि अन्य 12 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

यामध्ये करमाळा- राष्ट्रवादी, माढा- राष्ट्रवादी, बार्शी- SSUBT, मोहोळ (SC): राष्ट्रवादी, सोलापूर शहर उत्तर- भाजपा, सोलापूर शहर दक्षिण- INC, अक्कलकोट- भाजप, सोलापूर दक्षिण- भाजप, पंढरपूर- भाजप, सांगोला- PWPI, माळशिरस (SC)- भाजपा , अशी चुरस लढणार असल्याचे या नव्या सर्व्हेमधून दिसून आला आहे.

दोन सर्व्हेमध्ये पिछाडीवरील फडणवीस आले आघाडीवर; भाजप स्वबळावर गाठणार सव्वाशेचा आकडा

खासदार श्रीकांत शिंदे वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील जिल्हाप्रमुख आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक घेतली होती. यामध्ये सोलापूरमधील सर्व 11 विधानसभा मतदारसंघावर पॉईंट टू पॉईंट चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मिळतं आहे. यात खास करुन काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर मध्यसाठी खास चर्चा झाली असल्याचे ठरणार आहेत, तसेच शिवाजी सावंत यांनी आतापर्यंत 2004, 2009 आणि 2014 अशा विधानसभांच्या तीन निवडणुका लढविल्या आहेत. मात्र यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. आता आगामी भाजप आणि शिवसेना युती म्हणून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

News Arena India Survey : आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरेंच्या जागा धोक्यात ! नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ?

अशात माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते जर भाजपमध्ये गेल्यास त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे भाजपकडून माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असे सांगितले जात आहे. त्यामुळेच शिवाजी सावंत यांनी आपला मोर्चा ‘शहर मध्य’ कडे वळवल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. आणि राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यानंतर विरोधकांकडून सातत्यानं सत्ताधारी पक्षांना निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं जातं. मात्र, आता निवडणुका झाल्यातर पुन्हा भाजप शिवसेना युतीलाच जनतेच मोठे कौल दिला आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती?
न्यूज अरेनाच्या या सर्वेक्षणानुसार आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा मिळणार, याचा अंदाज वर्तवल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी राज्यातील मतदारांची कोणाला सर्वाधिक पसंती आहे, याची माहिती या ट्वीटमध्ये देण्यात आली आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३५ टक्के, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना २१ टक्के, सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना १४ टक्के, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ टक्के, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ९ टक्के मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

Tags

follow us