Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभेचे भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil ) यांचा आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. दरम्यान, त्यांनी टाकळी येथे आज गावकऱ्यांशी संवाद भेट संपन्न झाली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करून गावकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच मतदारसंघाच्या विकासाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला.
आज आपल्या टाकळी गावामध्ये विविध विकास कामे पार पडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या विकास कामांबरोबरच आपले आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी अत्यंत भरीव काम करण्यात आले आहे. आपल्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतून घराघरातील महिला भगिनींना आर्थिक पाठबळ दिले आहे. ज्याचा थेट हातभार त्यांच्या संसाराला लागत आहे. यातूनच आपल्या गावातील कुटुंबाचा आणि प्रत्येक घराचा शाश्वत विकास होत असून हा विकास फक्त महायुतीमुळे शक्य झाला आहे असं प्रतिपादन संभाजी पाटील यांनी उपस्थितांशी बोलताना केलं.
त्याचबरोबर महायुती सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आपण आणखीही ही सगळी काम करणार आहोत. त्यासाठी महायुती सरकार महत्वाचं आहे असं म्हणत संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारांना साथ देण्याच यावेळी आवाहन केलं. यावेळी त्यांच्या गावगावातील होणार आशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचंही पाहायला मिळाल आहे.
तालुकाध्यक्ष काशिनाथजी गरीबे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानदादाजी पाटील तळेगांवकर, जि.प.अध्यक्ष मिलिंदजी लातूरे, माजी सभापती गोविंदजी चिलकुरे, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिवजी पाटील, माजी सभापती शंकरजी पाटील तळेगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष अटलजी धनुरे, प्रशांतजी पाटील दवणहिप्परगेकर, माजी सभापती सत्यवानजी कांबळे उपस्थित होते.