Nitesh Rane On Rohit Pawar : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, रोहित पवारांना मी एक मैत्रीचा सल्ला देईल की, देशाचं राजकारण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण बाजूला ठेवा. आपल्या स्वतःच्या मतदारसंघात लक्ष द्या. नाहीतर पुढच्या वेळी रोहित पवार विधान सभेमध्ये दिसणार नाही. अशी टीका आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांवर केली आहे.
त्याचबरोबर ते पुढे असं देखील म्हणाले आहेत की, कर्जत जामखेडच्या लोकांबद्दल विचार करा. बाजार समितीमध्ये काय अवस्था झाली आहे. आमच्या राम शिंदे यांनी पवारांचा घाम काढला आहे. त्यामुळे मोठं मोठ्या बाता करण्यापेक्षा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून स्वतः च्या मतदारसंघाकडे बघा. मतदारांना नेमक काय हवं आहे याबद्दल विचार करा. मग आम्हाला सांग कुठे लक्ष घालायचं ते. असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांना दिला आहे.
कुकडीच्या पाण्यावरून राम शिंदेंनी रोहित पवारांना सुनावले
दरम्यान कुकडीच्या पाण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मे रोजी पाणी सुटणार असे घाईघाईने ट्वीट करणारे आमदार रोहित पवार आज 24 मे उजाडले तरी पाणी आलेले नाही, पण ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी केली. आमदार पवार यांची नौटंकी सुरू आहे व त्यांच्या मनात पाप आहे. मात्र, कर्जत-जामखेडची जनता त्यांना लक्षात ठेवणार आहे, नव्हे, त्यांनी लक्षात ठेवलेही आहे, असा दावाही प्राध्यापक शिंदे यांनी केला.
‘चमचे अन् पंक्तीला बसणारे दिल्लीला निघाले’; फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
कर्जत-जामखेड व करमाळासाठी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीत झाला आहे. या संदर्भात प्राध्यापक राम शिंदे यांनी वास्तव मांडून आमदार पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 22 रोजी सुटणारे पाणी 24 रोजीही सूटलेले नाही, यावर रोहित पवार बोलणार की नाही ?, असा सवालही प्राध्यापक शिंदे यांनी केला.