Download App

नितीन गडकरी प्रकरण; सुषमा अंधारेंनी दमानियांना कोंडीत पकडलं

Sushma Andhare On Anjali Damania :  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare On Anjali Damania :  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत उद्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात पोलखोल करायला सुरुवात करणार असल्याची माहिती दिली आहे. दमानिया यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.  नितीन गडकरी यांच्याविरोधात अंजली दमानिया कोणता खुलासा करणार याबाबत देखील सध्या अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहे.  उद्या पासून मी नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पोलखोल करायला सुरवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची मालिकाच सुरु  करणार आहे. असं अंजली दमानिया यांनी एक्स वर म्हटले आहे.

तर दुसरीकडे आता अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Anjali Damania) यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. अंजली दमानिया भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर किंवा भाजपमध्ये असणाऱ्या फडणवीस (Devendra Fadnavis) किंवा मोदींच्या (PM Modi) विरोधात असणाऱ्या लोकांना करत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

एकतर भाजपच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर किंवा भाजपमध्ये असणाऱ्या फडणवीस किंवा मोदींच्या विरोधात असणाऱ्या लोकांना टार्गेट केले जाऊ शकते हे मी 21 तारखेला लिहिलेलं आहे. ही क्रोनोलॉजी मेंदू असणाऱ्या कुठल्याही माणसाच्या लक्षात येईल. एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारे एकनाथ खडसे सुद्धा असेच अलगद बाजूला केले गेले. शोषितांचे लढे शोषकांच्याच कडून लढवले जातात. शोषितांना मात्र सतत असं वाटत राहतं की आपल्या लढ्याला एक नवा “मसीहा” मिळालेला आहे. #गंगाधरहीशक्तिमानहै असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यामुळे आता अंजली दमानिया सुषमा अंधारे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी रविवारी 21 सप्टेंबर रोजी ट्विट करत अंजली दमानिया नितीन गडकरी यांनी टार्गेट करणार आहे असं म्हणाल्या होत्या. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. फक्त भाजप वगळून इतर सगळ्यांची प्रकरणे हातात कशी काय येतात या प्रश्नाचं उत्तर नाहीय आणि हे आमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. असो, तुमचं पुढचं टार्गेट गडकरी असतील तर आम्हाला फार नवल वाटणार नाही.  कारण गडकरी हे तसे मोदी आणि फडणवीस दोघांनाही नकोच आहेत..! असं ट्विट करत सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती.

Ashes 2025 साठी इंग्लंडचा संघ जाहीर; बेन स्टोक्स कर्णधार अन् ‘या’ स्टार गोलंदाजाची एन्ट्री

 

follow us