Download App

…अन्यथा लोक म्हणतील भाजप अन् काँग्रेसमध्ये फरक काय?, अधिवेशनात गडकरींनी नेत्यांचे कान टोचले

आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत.

  • Written By: Last Updated:

Nitin Gadkari in BJP Adhiveshan : आपल्याला कुठ जायचं आहे हे आपण निश्चित केलं पाहिजे. शेतकऱ्यांना सर्व सुविधा, तरुणांना रोजगार, गाव-खेड्यातील सर्व सुविधा. त्यामध्ये रस्ते, पाणी वीज, आरोग्य अशा सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत. आपण काँग्रेसचा पराभव केला इतकंच करण्यासाठी नाहीत. आपण लोकांसाठी काय केलं हे महत्वाच आहे. (Nitin Gadkari) नाहीतर लोक म्हणतील काँग्रेस होत तेव्हाही असेच हाल होते आजही तेच आहेत. अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. ते शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

आज शहरांत मोठा विकास झालेला आपण पाहत आहोत. शहरात आरोग्य, शिक्षण, रस्ते अशा सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, फक्त शहरं स्मार्ट होऊन चालणार नाही तर आता गावखेडेही स्मार्ट झाले पाहिजेत असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर आजची ग्रामिण भागातील शाळांची अवस्था फारच बिकट आहे. ती सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याच गरज आहे असहंही ते म्हणाले.

राजकारणात फक्त युज अँड थ्रो केले जाते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत..

follow us