मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नाही. कुख्यात डॉन दाऊत इब्राहिम (Don Daut Ibrahim) याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांच्या वाढ झाली आहे. त्यामुळे मलिकांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे.
कुर्ला येथील जमीन गैरव्यवहारात नवाब मलिक यांच्यावर विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. तेव्हापासून मलिक हे जामिनाच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र, मलिक यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे आज देखील पुन्हा एकदा नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
सध्या नवाब मलिक हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. आणि त्यांच्यावर कुर्ल्यातील खासजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. मलिक यांची प्रकृती गंभीर असल्याचे उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले असले तरीही त्यांनी अद्याप जामीन मिळाला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मलिकांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसून येते आहे. दरम्यान, पुढील आदेशापर्यंत मलिक हे रुग्णालयातच राहतील, असे न्यायालयाने सांगितले.
Sunil Tingre म्हणाले भाजपकडून पिंपरीला न्याय… तर पुणेकरांवर मात्र अन्याय!
दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तेशी संबंधीत आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपात मलिकांना अटक झाली होता. नवाब मलिक, त्यांचा भाऊ अस्लम, हसीना पारकर आणि मुंबई बॉम्बस्पोटतील दोषी सरदार खान यांच्यात कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड संदर्भात बैठका झाल्या होत्या. ही जााग खरेदी करण्यासाठी हसीना पारकरला 55 लाख रुपये बेकायदेशीरपणे दिले गेले. या बेकायदेशीर व्यवहारात नवाब मलिक यांचा सक्रीय सहभाग असल्याचा आरोप ईडीने केला होता. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले हतो.