Maharashtra News : शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश असतोच त्याच पद्धतीने आता शिक्षकांनाही गणवेश लागू होऊ शकतो का याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा नव्याने सुरू होण्यामागे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचं (Dada Bhuse) एक वक्तव्य कारणीभूत ठरलं आहे. समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या डॉक्टर आणि वकील या पेशांसाठी जसा खास पोशाख असतो तसाच पोशाख शिक्षकांसाठीही असायला हवा असे मत मंत्री भुसे यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दादा भुसे यांनी शिक्षकांच्या गणवेशाबाबत वक्तव्य केले. शिक्षकांना राज्य पातळीवर एकच गणवेश लागू होणार नाही. पण, शिक्षकांनी शाळेच्या स्तरावर आपसात ठरवून एक गणवेश निश्चित करावा.
शिक्षकांनी कोणते कपडे घालावेत याबाबत वस्त्रसंहिता याआधीच लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुद्दा शिक्षकांच्या गणवेशाचा आहे. राज्य स्तरावर सर्व शिक्षकांसाठी एकच गणवेश निश्चित केला जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना कोणता गणवेश योग्य वाटतो याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळेला राहील. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर येताना एकसमान असल्याचे जाणवले पाहीजे हा यामागचा उद्देश आहे.
राज्यातील शाळांत CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काय सांगितलं?
डॉक्टर, वकील यांना त्यांच्या गणवेशावरून समाजात ओळखलं जातं. त्यांना मान दिला जातो. त्याच पद्धतीने शिक्षकांनाही त्यांच्या शाळेच्या गावात मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिक्षकांच्या गणवेशाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. गणवेशाबाबत शिक्षक संघटना आणि शिक्षकांची मते वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्यांच्यात समन्वय येणं कठीणच आहे.
शिक्षकांसाठी याआधीच वस्त्रसंहिता निश्चित केलेली असताना त्यात आता गणवेशाची काय गरज आहे असा सवाल शिक्षकांतून विचारला जात आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलेले मत शिक्षक आणि त्यांच्या संघटना विचारात घेणार का, त्यानुसार कार्यवाही करणार का, शाळेतील शिक्षकांनी ठरवून एकच गणवेश लागू केला जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दादा भुसेंच्या गुंडांकडून ठाकरे गटाच्या अद्वय हिरेंवर हल्ला; खासदार संजय राऊतांनी केला गंभीर आरोप