Download App

केंद्र सरकारची जबरदस्त योजना, मिळणार स्वस्त व्याजदरात 20 लाख; जाणून घ्या सविस्तर

Pradhan Mantri MUDRA Yojana : केंद्र सरकारने लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेत केंद्र सरकार कमी व्याजदरात 20

  • Written By: Last Updated:

Pradhan Mantri MUDRA Yojana : केंद्र सरकारने लोकांना आर्थिक मदत देण्यासाठी एक योजना सुरु केली आहे. या योजनेत केंद्र सरकार कमी व्याजदरात 20 लाखांचा कर्ज देत आहे. या योजनेत कर्ज तारणमुक्त आहे. या योजनेचा नाव प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri MUDRA Yojana) असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25  च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेत कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. ही नवीन मर्यादा 24 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली आहे.  ‘शिशु’, ‘किशोर’, ‘तरुण’ आणि ‘तरुण प्लस’ या चार श्रेणींमध्ये मुद्रा कर्ज योजनेत कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रत्येक श्रेणीसाठी कर्जाची रक्कम वेगळी असते.

शिशु:  50, 000 रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

किशोर: 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

तरुण: 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा समावेश आहे.

तरुण प्लस: 10 लाख रुपयांपासून 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

कोणत्या बँका कर्ज देतात?

मुद्रा योजनेअंतर्गत, 20 लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज सदस्य कर्ज देणाऱ्या संस्था (MLIs) जसे की अनुसूचित व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs), लघु वित्त बँका (SFBs), नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs), सूक्ष्म वित्त संस्था (MFIs) इत्यादींद्वारे प्रदान केले जाते.

10 वर्षे जुनी योजना

ही योजना दहा वर्षांपूर्वीची आहे. मुद्रा योजनेमुळे 52 कोटींहून अधिक कर्ज खाती उघडण्यास मदत झाली आहे, जी उद्योजकीय क्रियाकलापांमध्ये सातत्याने वाढ दर्शवते. आर्थिक वर्ष 2016 मध्ये किशोर कर्जाचा वाटा 5.9 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 44.7 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

शिल्लक सेना चायनीज माल, जनतेत खपणार नाही, खासदार नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

मुद्रा योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 68 टक्के महिला आहेत. आर्थिक वर्ष 16 ते आर्थिक वर्ष 25 दरम्यान, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या वितरण रकमेत प्रति महिला वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढ होऊन ती 62,679 रुपयांवर पोहोचली.

follow us

संबंधित बातम्या