Download App

कॅनरा बँकेला कोट्यावधींचा गंडा, नगरच्या समता पतसंस्थेच्या संचालकापर्यंत कनेक्शन

Shirdi Crime : शिर्डी येथे ‘द गेट वे हॉटेल’ या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कॅनरा बॅकेकडून (Canara Bank) कर्ज घे ते बुडवल्याप्रकरणी पुणे स्थित ट्रिलियन रिअल इस्टेट कंपनीविरोधात सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला होता. बँकेने दिलेल्या तक्ररीत कंपनीचे माजी संचालक सोमनाथ साक्र, संदीप कोयटे, आश्रभ गर व जया गरड यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

यातील संदीप कोयते हे कोपरगाव येथील समता पतसंस्थेचे संचालक आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा मुलगा आहे. ट्रिलियन इस्टेट कंपनीचा माझा मुलगा हा संचालक होता. त्याने पूर्वीच संचालकपद सोडलेले असल्याचा दावा काका कोयटे यांनी केला आहे.

दरम्यान ‘द गेट वे हॉटेल’ हे फोर स्टार हॉटेल बांधून झाल्यानंतर ताज समुहासोबत ते संलग्न होण्याचा प्रस्ताव होता. मात्र कंपनीने हॉटेलचे बांधकाम अर्धवटच सोडले. त्याकरिता घेतलेल्या कर्जाच्या रकमेची अफरातफर केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने कंपनी व संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

2000 Rupees Note: मोदींना भर चौकात फाशी द्या, नोटबंदीनंतर संजय राऊत कडाडले

या फोर स्टार हॉटेलच्या उभारणीसाठी कंपनीने 2013 ते 2016 या कालावधीमध्ये कॅनरा बँकेकडून 55 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. एप्रिल 2016 मध्ये हॉटेलचे काम पूर्ण होऊन ते सुरु होणे अपेक्षित होते. मात्र ते होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात कंपनीने कर्जाची परतफेडही न केल्याने कंपनीचे कर्ज खाते 31 मार्च 2016 रोजी थकीत कर्ज खाते म्हणून घोषित झाले. याप्रकरणी कॅनरा बँकेला 39 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. फोरेन्सिक ऑडिटमध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती पुढं आली.

ACB Trap : कोपरगावचे तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, काय आहे प्रकरण?

कॅनरा बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. कर्ज प्राप्त रकमेचे पैसे फिरवणे, व्यवहारांच्या बनावट नोंदी तयार करणे, नियम व अटींचा भंग करणे असे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत.

Tags

follow us