Download App

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Nashik Trimbakeshwar Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या (Jyotirlinga Temple)मंदिरात हिंदू धर्मियांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश नसताना गेल्या शनिवारी रात्री अन्य धर्मियांच्या एका जमावाने मंदिरात घुसखोरीचा केलेला प्रयत्न सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडला. या घटनेनंतर श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टसह (Trimbakeshwar Devasthan Trust)नाशिकच्या ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation)पोलिसांकडे तक्रार अर्ज देऊन याची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर समाजमाध्यमांतून विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर आता या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

रस्त्यावर धावणाऱ्या बसची दोन्ही चाकं अचानक निखळली, बसमध्ये होते 35 प्रवासी

या घटनेवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule)यांनी ट्वीट करत या घटनेकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, त्र्यंबकेश्वर मंदिरात दि. 13 मे रोजी दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाचा आग्रह धरत देवाला धूप दाखविण्याची केलेली कथित मागणी अतिशय धक्कादायक आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी (SIT)स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदूधर्मीयांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही एसआयटी केवळ या वर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल. गेल्या वर्षी एका विशिष्ट जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता, असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात काही जणांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. त्यानंतर देवस्थानने पोलिसांना पत्र पाठवत घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. आता या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआयआर नोंदवून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us