मोठी बातमी; खासदार नीलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला, पाहा व्हिडिओ

पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे.

खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला

Attack Nilesh Lanke supporter : अहमदनगर जिल्ह्यात पारनेर बसस्थानक परिसरात खासदार नीलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी घडली आहे. या हल्ल्यामध्ये निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे जखमी झाले आहेत. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये नगरमध्ये लंकेंच्या समर्थकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यामध्ये राहुल झावरे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे. यावेळी विद्यमान खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके समर्थक आमने सामने आल्याची माहिती आहे. खासदार निलेश लंके यांच्या समर्थक राहुल झावरे यांच्यावर यावेळी प्राण घातक हल्ला झाला.

सुजय विखे समर्थक विजय औटीसह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये झावरे किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Exit mobile version