Download App

‘मोकाट कुत्र्यांच्या प्रणयक्रीडेमुळे महिलांचा विनयभंग’; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच पत्र

  • Written By: Last Updated:

नाशिक : नाशिक (Nashik) शहरात भटकी कुत्रे (stray dogs) आणि जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावर संभोग करतात, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांच्या मनात लज्जा निर्णाण होते. या संदर्भात स्थानिकांनी नगरपालिकेकडे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector of Nashik) पत्र लिहून पालिकेच्या प्रशासकांवरच विनयंभगाची केस करावी, अशी मागणी केली.

शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली. हे कुत्रे रस्त्यावर संभोग करतात. त्यामुळं महिला, मुलींच्या मनात लज्जा निर्माण होते. याबाबत आता स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना एक पत्र लिहिलं. त्यात लिहिलं की, विवेक धांडे हे नांदगांव नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी म्हणून काम करतात. मात्र, नांदगांव शहरामध्ये मोकाट कुत्रे व गायी (मोकाट जनावरे) हे भर रस्त्यात संभोग करतात. त्यामुळे रस्त्यावर जाणारे-येणारे महिला, मुली यांना लज्जा उत्पन्न होते. आणि त्यांच्याकडे पुरूषांनी बघतल्यास त्यांचा विनयभंग झाल्या सारखा होतो.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साईबाबांचरणी लीन… 

या मोकाट कुत्र्यांची जबाबदारी प्रशासकाची आहे. मात्र, त्यांच्याकडून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. त्यामुळं त्यांच्यावरच आता वियनभंगाचा गुन्हा दाखला करण्यात यावे, अशी मागणी या पत्रात केली. शिवाय, मोकाट कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, असं या पत्रात लिहिलं आहे.

या पत्राची प्रत नागरिकांनी आमदार सुहास कांदे, नांदगावचे तहसीदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिली आहे. नागरिकांनी थेट कलेक्टरालाच पत्र लिहिलं आहे. त्यामुळं यावर काय तोडगा निघतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.

मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ला-
रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांवर मोकाट कुत्र्यांनी थेट हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत लोकप्रतिनिधींना वारंवार सांगूनही कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही.

Tags

follow us