Download App

शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? उत्तरासाठी अहमदनगरच्या शिक्षिकेला घ्यावी लागली लाईफलाईन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलेला सोहळा आहे. रायगड किल्ल्यावरील या ऐतिहासिक सोहळ्याला आता 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र हाच शिवराज्याभिषेक सोहळा कुठे झाला? या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ‘कोण होईल करोडपती’ या कार्यक्रमात अहमदनगर येथील एका शिक्षिकेला चक्क लाईफलाईन घ्यावी लागल्याचं समोर आलं आहे. (A teacher had to seek help to tell where the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj took place)

ज्योती मचे असे या शिक्षिकेचे नाव असून त्या माध्यमिक वर्गात शिकवितात. मचे यांचा यासंबंधित एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. मुलांना शिकविणाऱ्या एका शिक्षिकेलाच शिवराज्याभिषेक कुठे झाला याचा उत्तर सांगण्यासाठी लाईफ लाईन घ्यावी लागल्याने त्या ट्रोल होण्यास सुरुवात झाली आहे.

नेमके काय घडले?

8 ऑगस्ट 2023 रोजी सोनी मराठीवर ‘कोण होईल करोडपती’ या कार्यक्रमाच्या चौथ्या सिझनचा 62 वा भाग प्रकाशित झाला. याच भागात हॉटसीटवरती ज्योती मचे आल्या. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. त्यांचं एमएस्सी बीएडपर्यंतचे शिक्षण झाले आहे.

या कार्यक्रमात ज्योती मचे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? असा प्रश्न विचारण्यात आला. 10 हजार रुपयांसाठी त्यांना हा पाचवा प्रश्न विचारण्यात आला होता. यात त्यांना प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड आणि रायगड असे चार पर्याय देण्यात आले. मात्र या प्रश्नाचे उत्तर देताना त्या गोंधळलेल्या दिसल्या.

20 सेकंद विचार करुनही त्यांना उत्तर काय द्यायचे हे सुचत नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘व्हिडीओ अ फ्रेंड’ ही लाईफलाईन घेण्याचे ठरविले. यानंतर त्यांनी इंजिनीअर असलेल्या अमर मरकड यांना फोन केला. मरकड यांनीही त्यांना उत्तर देताना “मला रायगड वाटते” असं उत्तर दिलं. त्यामुळे ज्योती मचे यांच्यासह मरकड यांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. हे व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत.

Tags

follow us