नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून आंदोलनं (Movement) सुरु आहेत. आता हे लोन गावागावात पोहचलंय. अशातच देवळा (Deola) तालुक्यातील माळवाडीच्या (Malwadi Village) ग्रामस्थांनी सरकारच्या धोरणाच्या (Government policy)निषेधात थेट गावच विकायला काढलंय. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाव विकणे आहे (The village is for sale), अशा आशयाचा बोर्ड लावलाय. आख्ख गावच विकायला काढलेल्या गावकऱ्यांनी राज्य सरकारला गाव विकत घेण्याचं आवाहन देखील केलंय.
राज्यात काही दिवसांपासून कांदा दरात घसरण, सरकारचं शेतकरी (Farmers) विरोधी धोरण, अनेक वर्षांत शेती मालाला मिळत नसलेला भाव यामुळं शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय. शिवाय दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळं शेतकरी दुहेरी संकटाच्या कचाट्यात पूरता सापडलाय.
Ravindra Dhangekar : धंगेकरांचे काय आहे बारामती कनेक्शन? वाचा सविस्तर
या सरकारच्या धोरणांविरोधाचा निषेध म्हणून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी गावानं थेट गावच विक्रीला काढलंय. गेल्या चार पाच वर्षांपासून शेती मालाला भाव मिळत नाही, त्यामुळं गावातील शेतकरी चांगलाच वैतागलाय. याच कारणांमुळं गाव विकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. ग्रामस्थांनी एकत्र येत गाव विक्रीबाबत ठरावच केला असून शासनाला गाव विकण्याबाबतचा ठराव पाठवला जाणारंय. गावकऱ्यांच्या या अनोख्या निर्णयामुळं जिल्ह्यात माळवाडी गाव चांगलंच चर्चेत आलंय.
त्यातच ग्रामस्थांची सरकारकडं गाव विकत घेण्याची मागणी देखील केलीय. आत्महत्या करण्यापेक्षा जमीन विकून सुखी जीवन जगता येईल, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. माळवाडी हे हजार दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे. येथील गावकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. जवळपास 534 हेक्टरवर शेती करतात. यात भाजीपाला, ऊस, कडधान्य आणि नगदी प्रमुख पीक कांद्याचं घेतलं जातं. त्यातच गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कोणत्याही शेती उत्पादित मालाला भाव मिळत नसल्यानं ग्रामस्थ हवालदिल झालेत. त्यामुळं गावकऱ्यांनी थेट गावच विकण्याचा निर्णय घेतलाय.