Download App

Aashadhi Wari 2023 : मुख्यमंत्र्यांसोबत नगर जिल्ह्यातील वारकऱ्याला शासकीय महापूजेचा मान

Aashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात (Pandharpur)विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते पार पडली. त्यात यंदाचे मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे (bhausaheb kale)व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला आहे. महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर विलक्षण असा आनंद पाहायला मिळाला.(aashadhi wari 2023 pandharpur vitthal rukmini mahapooja cm eknath shinde ahmednagar bhausaheb kale)

पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (दि.29) आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील शेतकरी दाम्पत्य भाऊसाहेब मोहनीनाथ काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांना मिळाला.

मोठी बातमी : चांद्रयान – 3 प्रक्षेपणासाठी सज्ज, 12-ते 19 जुलै दरम्यान आकाशात झेपावणार

महापूजेचे मानकरी ठरलेले काळे दाम्पत्य हे मागील 35 वर्षांपासून देवड येथील भास्करगिरी महाराज यांच्या पायी दिंडीत सहभागी होत आहे. यंदा त्यांना महापुजेचा मान मिळाला आहे. त्याचवेळी या दाम्पत्याला एसटी महामंडळाकडून एक वर्षांचा मोफत पासही देण्यात आला. याप्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, सोलापूर जिल्ह्याचेपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत, गिरीश महाजन, दीपक केसरकर, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

हा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याला गहिवरुन आले. एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन व्हावे म्हणून ते सकाळी सहा वाजता दर्शन रांगेमध्ये उभा राहिले होते. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून हे दाम्पत्य देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्या पायी दिंडीत सहभागी होत आहेत.

आपल्याला महापूजेचा मान मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही झालो. आपल्याला दोन मुलं अन् दोन मुली असल्याचे यावेळी शासकीय महापुजेचा मान मिळालेल्याकाळे दाम्पत्याने सांगितले आहे. महापुजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर विलक्षण असा आनंद पाहायला मिळाला.

Tags

follow us

वेब स्टोरीज