Download App

ACB Trap : कोपरगावचे तहसीलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, काय आहे प्रकरण?

  • Written By: Last Updated:

ACB Trap : वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करता त्यांचाकडून वीस हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील कोपरागावचे तहसीलदार विजय बोरूडे यांना रंगेहाथ पकडले तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

तसेच या प्रकरणी गुरमीत दडियल याला देखील रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबतची माहिती अशी आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी गुरमीत दडियल याने तहसीलदार विजय बोरुडे यांच्यासाठी वाळू तस्करांकडे वीस हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्याने हि लाच घेतल्याचे अ‍ॅन्टी करप्शन विभागा पथकासमोर मान्य केले.

https://www.youtube.com/watch?v=WYyIDGgDii0&t=2s

अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने सापळा रचला असता गुरमीत दडियल याला वीस हजार रुपयांची लाच घेताना पकडले. यावेळी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुरमीत दडियलसह कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Chhota Pudhari; पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांना दोन हजाराच्या नोटेचा झटका

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर,अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या सह पोलिस उप अधीक्षक वैशाली पाटील
यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली आहे.

 

Tags

follow us