Ahmednagar News : गोर-गरीबांचे जमिनी लाटून मागील काळात झालेल्या लूटमारीला आता हे सरकार चाप लावणार असून पुढील सहा महिन्यांत स्टॅम्प पेपर (Stamp paper) हे पूर्ण बंद करण्याचा निर्णय राज्यातले महायुतीचे सरकार घेणार असल्याचे खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की स्टॅम्प पेपरवर गोर-गरिबांच्या जमिनी हडपण्याचे काम मागील काळात याभागात मोठ्या प्रमाणावर झाले, त्यामुळे असे प्रकार राज्यात कुठेही होहु नये याकरिता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्टॅम्प पेपर हे बंद करून त्या ऐवजी आता फ्रँकिंग सिस्टीम ही सुरू होणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास संमती दिली आहे.
तुम्ही संस्थापक अध्यक्ष तर मी पहिला प्रदेशाध्यक्ष; भुजबळांकडून थेट पवारांशी तुलना
येत्या सहा महिन्यांत हे स्टॅम्प पेपर पूर्ण बंद होणार असल्याचे सांगून काही निर्णय घेताना सुरुवातीस थोडा त्रास होतो मात्र याचे दूरगामी चांगले परिणाम दिसतात. वाळूचा असाच ऐतिहासीक निर्णय घेतला काही दिवस याचा त्रास होईल परंतु यातून वाढणारी गुन्हेगारी ही संपूर्णपणे थांबेल असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.