Aditya Thackeray: माझ्या मतदारसंघात कितीही सभा घ्या, मीच जिंकणार

नाशिक : युवा सेना प्रमख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, ”मला आनंद या गोष्टीचा आहे की माझा विजय आजच झाला आहे. माझ्या […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

नाशिक : युवा सेना प्रमख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, ”मला आनंद या गोष्टीचा आहे की माझा विजय आजच झाला आहे. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जोडीने यावं लागतंय आणि सभा घ्यावी लागतीय.”

”जगभरात जिथं फुटबॉल किंवा क्रिकेटचे मोठे गेम होतात. फुटबॉलच्या मैदानात मेस्सी किंवा रोनाल्डो उतरतात त्यावेळी त्यांच्यासमोर पाच ते दहा खेळाडू उभा राहतात आणि एकट्याला भिडतात. तसे माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सचिन मैदानात येते त्यावेळी चार-पाच खेळाडू एकत्र येतात आणि कुठं फिल्डिंग लावायची? कशी लावायची? याचं प्लॅनिंग करतात पण मी सिक्स मारणारच आणि जिंकणारच, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

चांदोरी येथील शेतकरी मेळाव्यात कार्यक्रमस्थळी आदित्य ठाकरे चक्क बैलगाडीतून दाखल झाले. आकर्षक पद्धतीने बैलगाडी सजून यावर विराजमान होत आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रम स्थळी दाखल झाले.

यावेळी मोठ्या जल्लोषात आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सभा घेत असून कितीही सभा घेतल्या तरी माझ्या मतदार संघात मी जिंकणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Exit mobile version