पुण्याच्या आंदेकर टोळीतील पाच जणांना अहिल्यानगरमधून अटक, 4 पिस्टल अन् 10 जिवंत काडतुसे जप्त

पुण्याच्या आंदेकर टोळीतील 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 पिस्टलसह 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.

ahilyanagar news

ahilyanagar news

Ahilyanagar News : पुण्यातील आंदेकर टोळीचे (Aandekar Gang) धागेदोरे फक्त पुण्यातच नाही तर आता अहिल्यानगरमध्येही असल्याचं समोर आलंय. आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 पिस्टलसह 10 जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलीय.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची सर्व 17 जागा लढवण्याची मोठी घोषणा

पुणे येथील कुविख्यात आंदेकर टोळीतील 5 जणांना आहिल्यानगरातीली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील मिरावली पहाडच्या पायथ्याशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती.

पत्रकार परिषदेत हसली, आता घरीच बसली; ‘विजय’ सरकारकडून IPS रम्या भारतीचं थेट निलंबन…

अटक करण्यात आलेले पाचही जण दरोड्याच्या तयारीत होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि या पाच जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 4 पिस्तुल, 10 जिवंत काडतूसे, 1 कोयता,1 चाकूसह अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. यासह या पाच जणांकडून 2 लाख 76 हजारांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलायं.

बकरी ईदला बकरा आणला, मग काय हिंदुत्ववाद्यांनी डुक्करच आणलं…फडणवीसांनी लक्ष घालताच वातावरण शांत

मुश्ताक शेख विराट मेहंदळे, समर्थ माडळकर,समर्थ दूधभाते, आणि आकाश पवार अशी आहेत. यामध्ये समर्थ माडळकर आणि समर्थ दूधभाते या दोघांवर याआधीच पुणे शहरात खुणाचा प्रयत्न, मकोका, शस्त्र बागळने यासाह अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version