Ahilyanagar News : एकमेकांना त्रास होणार नाही असा समाज निर्माण होण्याची गरज आहे. परंतु, सध्याची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचे आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी लाठीकाठीचं प्रशिक्षण घेणंही काळाची गरज आहे. लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक तयार झाले पाहिजेत. शाळांतून विद्यार्थ्यांना याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, असे आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी (Narendra Firodia) केले.
सकल राजस्थानी व गुजराती समाजाच्यावतीने केशर गुलाब मंगल कार्यालयात आयोजित लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फिरोदिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी भारत भारतीच्या राष्ट्रीय सचिव साधना राव, प्रदेश सचिव डॉ. धर्मेंद्र राजवद, उद्योजक जितेंद्र बिहाणी, चंद्रकांत मुनोत फाउंडेशनच्या मेघना मुनोत आदी उपस्थित होते.
नव्या पिढीला होणार लोककलेची ओळख, नरेंद्र फिरोदियांनी हाती घेतला Folkवंत उपक्रम
यानंतर जितेंद्र बिहाणी म्हणाले, की जैन, राजस्थानी, गुजराती समाजाचा स्वभाव नम्र आहे. याचा अर्थ हा समाज प्रतिकार करत नाही असा समज झाला आहे. आता ही परिस्थिती बदलणे आवश्यक बनले आहे. यासाठी लाठीकाठी प्रशिक्षणातून या गोष्टी प्रत्यक्षात येतील. यासाठी कमलेश भंडारी यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. यासाठी सहकार्य करू.
कमलेश भंडारी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, स्वसंरक्षणची आज जास्त गरज आहे. नव्या पिढीला सक्षम करण्यासाठीच लाठीकाठीच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना एकत्र आल्या आहे. त्यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. आता दिवाळीच्या सुट्टीत दांडपट्टा प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा मानस आहे, असे भंडारी यांनी सांगितले.
या प्रशिक्षण शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 300 हून अधिक नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला. पुण्यातील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याचे विजय आचवले आणि तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनेश कोठारी यांनी केले. श्याम भुतडा यांनी आभार मानले.
यावेळी राकेश भंडारी भारत भारतीचे रमेश रासने, हरिष हरवानी, चंद्रकांत पंडित, समीर बोरा, मनीष सोमाणी, सचिन भंडारी, सचिन डुंगरवाल, सत्येन गुंदेचा, प्रवीण शिंगवी व प्रमोद गांधी आदींसह अहिल्यानगर शहरातील जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन ओसवाल युवक संघ, माहेश्वरी युवक मंडळ, सकल राजस्थानी युवा मंच, जय आनंद महावीर युवक मंडळ, जय आनंद फाउंडेशन, दालमंडई, श्री महावीर प्रतिष्ठान ट्रस्ट, जितो अहिल्यानगर, जिंगर युवा मंच, वर्धमान युवक संघ, समस्त गुजराथी समाज, भारत भारती, जिजाऊ ग्रुप व वंदे मातरम युवा प्रतिष्ठान आदी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.