Download App

दारूचा महापूर वाहणार तोच पोलिसांची कारवाई…लाखोंचा मद्यसाठा जप्त

  • Written By: Last Updated:

Ahmednagar News : नगर शहरातील कल्याण महामार्गावरून एका दारूच्या कंपनीचा मोठा अवैध साठा पोलिसांनी ताब्यात घेत घेतला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्ब्ल 27 लाख रुपयांचे 150 दारूचे बॉक्स जप्त केले आहे. पोलिसांनी यापकरणी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान जिल्ह्यात दारूचा महापूर वाहणार तोच पोलिसांनी तातडीने कारवाई करत हा डाव हाणून पाडला आहे.(Ahmadnagar Police’s big action, seized illegal liquor worth lakh)

याबाबत अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहमदनगर शहर परिसरात फिरुन अवैध धंद्यांची माहिती घेत होते. याच दरम्यान पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गोव्यातून एका टेम्पोमधुन विदेशी कंपनीची दारु महाराष्ट्रात विक्रीचा परवाना नसताना विना परवाना बेकायदेशिरित्या नगर कल्याण रोडने अहमदनगर कडे येत आहे. आहेर यांनी तातडीने प्राप्त माहिती पथकास कळवली.

पथकाने नगर कल्याण रोडने जावुन नेप्ती नाक्याजवळ सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला. त्यावेळी गाडीचे केबिनमध्ये दोन इसम बसलेले पथकास दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन, आयशर टेम्पोची पाहणी करता टेम्पोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची थरारक कहाणी अजित पवारांनी सभागृहात सांगितली

दोन्ही इसमांना विदेशी दारु वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस करता त्यांनी वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) बाबु लखुभाई राठोड, (रा. राजकोट, राज्य गुजरात) व 2) सिध्देश संदीप खरमाळे (रा. भांडगांव, ता. पारनेर) असे सांगितले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 150 दारूचे बॉक्स तसेच आयशर कंपनीचा विटकरी रंगाचा टेम्पो असा एकुण 27 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags

follow us