Ahmednagar : पोलीस बनले शेतमजूर; फिल्मी स्टाईल पाळत ठेवून आरोपीला केले जेरबंद

Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार […]

UPSC Exam (3)

UPSC Exam (3)

Ahmednagar Crime : कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व दोन महिनेपासून फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. विशेष म्हणजे आरोपींना पकडण्यासाठी पोलीस चक्क वेषांतर करून शेतमजूर बनले होते. मोठ्या शिताफीने आरोपींना पोलिसांनी पकडले आहे.

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. राजू समशुद्दीन शेख व अजीम शमशुद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी सात एप्रिल रोजी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील मुलीच्या घरात प्रवेश करून मुलीचे दोन्ही हात पाय बांधून बळजबरीने अत्याचार केला होता व ही घटना कोणाला सांगितल्यास आई व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात राजू शेख व अजिज शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Women’s Junior Hockey Asia Cup: कोरियावर ऐतिहासिक विजय मिळवत, भारताने प्रथमच ज्युनियर महिला आशिया कप जिंकला

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांचा शोध सुरू केला असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन्ही आरोपी दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या नुसार पोलीस पथकाने शेतमजूर म्हणून वेषांतर करून दोन दिवस पळत ठेऊन राजू शेख व अजिज शेख या दोघांनाही ताब्यात घेतले आहे या दोघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version