Download App

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड? विम्याच्या अग्रीमबद्दल कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Dhananjay Munde : शेतकऱ्यांना (Farmer)नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये विम्याची अग्रीम 25 टक्के रक्कम ही दिवाळीच्या (Diwali 2023)आत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. अहमदनगरमध्ये (Ahmednagar)शब्दगंध साहित्य परिषदेचे (Shabdgandha Sahitya Parishad)उद्घाटन झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमाशी बोलत होते. यावेळी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

अजितदादा गटाच्या बॅनरवर शरद पवारांऐवजी ‘या’ नेत्याचा फोटो; मंत्री धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

पावसाळा झालेला आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. एक रुपयांमध्ये पिक विमा हा मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे असा प्रश्न कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना विचारण्यात आला, त्यावर मंत्री मुंडे म्हणाले की, ज्या, ज्या मंडळामध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी, जिथे पावसाचा 21 दिवसाचा खंड पडलेला आहे, असे अधिसूचित मंडळ आहेत याची माहिती घेतली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया उद्या महामुकाबला; प्रथम फलंदाजी की गोलंदाजी, जाणून घ्या कशी आहे चेन्नईची खेळपट्टी?

काही मंडळाच्या संदर्भामध्ये विमा कंपनीच्या अडचणी होत्या, त्यासुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडवल्या असल्याचे यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच त्यांनी विमा कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली, दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम ही दिवाळी आधी त्याची दिली जाईल असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा :
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच पीक विमा योजनेसंदर्भात आढावा घेतला. पीक विमा योजनेंतर्गत 2020-21 मध्ये 6 विमा कंपन्यांपैकी चार कंपन्यांकडे 224 कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोवीड काळातील विविध कारणं देऊन ती थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यावरुन आढाव बैठकीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई द्यावी. ती येत्या आठ दिवसात न दिल्यास कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे. त्यामुळे पीक विमा कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Tags

follow us