Download App

आतुरता गणरायाच्या आगमनाची…; गणेश मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

Ahmednagar : गणरायांच्या आगमनाला काही दिवसांचं कालावधी उरला आहे. मात्र गणरायाच्या आगमनासाठी आता नगर शहरातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती रंगरंगोटीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी कामे सध्या वेगात सुरू आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या तब्बल चार तसे सहा महिने आधीच सार्वजनिक मंडळाच्या ऑर्डर या आलेल्या असतात. यामुळे आता कारखान्यात कारागिरांच्या हातांना वेग प्राप्त झाला आहे.

पोलिस दिसताच चौघांनी थेट अंगावरच गाडी घातली, जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणची घटना

वर्षभर वेगवगेळे सण उत्सव हे साजरे केले जात असतात. मात्र या सर्व सणोत्सवापेक्षा भाविकांना व भक्तांना आतुरता असते ती म्हणजे गणरायाच्या आगमनाची. गणरायाच्या आगमनाची तयारी महिनोंमहिने आधीपासूनच सुरू होत असते. यातच गणरायाच्या मूर्ती बनविण्याचे काम गणपती कारखान्यांमध्ये वर्षभर देखील सुरु असते. सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळे देखील तयारीला लागले आहे.

ठाकरेंची नगर जिल्ह्यात ताकद वाढणार…; साजन पाचपुते ‘शिवबंधन’ बांधणार

सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तींचे बुकिंगसुद्धा करून ठेवले आहे. यंदा पावसाने पाठ फिरवली असल्याने दुष्काळाचे सावट जिल्ह्यावर आहे. यामुळे मूर्ती विक्रीला काही फटका बसेल की काय? अशी चिंता सध्या विक्रेत्यांना वाटू लागली आहे. मात्र वर्षभर वाट पाहायला लावणारा असा हा मोठा सार्वजनिक उत्सव असल्याने मूर्ती खरेदी अधिक असेल, असा विश्वास मूर्तिकार यांना आहे.

गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल या आशेने आम्ही हजारो मूर्ती बनविल्या आहेत. अशी माहिती मूर्तिकार प्रफुल्ल लाटणे यांनी दिली. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्यांच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार अहोरात्र झटत आहेत. अनेक छोट्या मूर्ती या तयार झाल्या असून त्या जिल्ह्याबाहेर पाठवण्यासाठी तयार आहे. तसेच अनेक मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचा बाकी असल्याचे लाटणे यांनी सांगितले.

‘चांद्रयान – 3’ थीम असलेला गणराय साकारणार
देशासह अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले भारताचे चांद्रयान-3 हे यशस्वीरीत्या चंद्रावर लॅण्ड झाले. यामुळे देशाच्या शिरपेचात मनाचा तूरा रोवला गेला. ही थीम आता गणेश मूर्तीमध्ये देखील लवकरच दिसणार आहे. या थीममध्ये गणेश मूर्ती साकारली जाणार असल्याची माहिती गणेश मूर्तिकार यांनी दिली आहे.

Tags

follow us