Download App

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! नगरकरांनी जड अंतःकरणाने विशाल गणपतीला दिला निरोप

Ganpati Bappa Morya : मोठ्या थाटात आगमन झालेल्या गणरायाचे आज विसर्जन करण्यात येत आहे. दरम्यान नगर शहरात पारंपरिक वाद्याच्या सुरात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून नावाजलेला विशाल गणपती (Shri Vishal Ganpati)तसेच मानाच्या गणपतीला आज मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यावेळी नगर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग भाविकांनी दाटलेला पाहायला मिळाला.

भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…

अहमदनगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर (Shri Vishal Ganpati Temple)येथे अनंत चतुर्दशीनिमित्त आयोजित ‘श्रीं’ची विधिवत उत्थापन पूजा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ (Siddharam Salimath)व मीनाक्षी सालीमठ यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर विसर्जना मिरवणुकीला शहरात सुरूवात झाली आहे.

रणबीर कपूरला बर्थडे गिफ्ट! बहुचर्चित ‘अॅनिमल’चा टीझर रिलीज…

गणरायाची मोठ्या थाटामध्ये माळीवाडा येथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थान अध्यक्ष अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे आदी विश्वस्त यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय नगरच्या रस्त्यावर उतरला होता. मोरया…मोरया… गणपती बाप्पा मोरया”… “एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार”… “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला आहे. भक्तिमय वातावरणात मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.

मिरवणुकीच्या अग्रभागी सनई -चौघडे, दोन ढोल पथक सहभागी झाले. सजविलेल्या रथामध्ये विसर्जन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अक्षरशः भाविकांच्या डोळ्यात पाणी तराळलेले पाहायला मिळाले.

Tags

follow us