Download App

कुकडी पाणी प्रश्न : जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, विखेंचे वळसे पाटलांना सडेतोड उत्तर

Sujay Vikhe Speak On Dilip Walse Patil : कुकडी पाण्याचा वाद चांगलाच पेटला आहे. या पाण्याच्या वादावरुन आता भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party)शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना यावर आता खासदार सुजय विखे (Sujay Vikhe)यांनी भाष्य केले आहे. नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. आम्ही कोणाचे पाणी पळविले नाही आहे. उलट इथं पाण्यावरुन आमच्यावरच अन्याय झाला असल्याची भावना खासदार सुजय विखे यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच यावेळी त्यांनी वळसे पाटील यांना शाब्दिक टोला देखील लगावला आहे. (ahmednagar-kukadi-water-sujay-vikhe-speak-on-dilip-walse-patil-ncp-bjp)

इंदिरा इज इंडिया…; कंगना रनौतच्या ‘इमर्जन्सी’चा टीझर रिलीज

खासदार सुजय विखे हे आज जिल्हा रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी कुकडी पाणी प्रश्नावरुन सध्या राज्यात पुन्हा एकदा वातावरण चिघळणार असे चित्र निर्माण झाले आहे.

पंजाब डख यांचा अंदाज खरा ठरला, राज्यात पावसाला सुरुवात…

नुकतेच या पाणी प्रश्नावरुन भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. यावर बोलताना विखे म्हणाले, नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. आम्ही त्यांच्या वाटेचे पाणी काही मागत नाही आहे. पाणी प्रश्नावरुन आजवर नगर जिल्ह्यावरच अन्याय झाला आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी कधीही नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळू दिले नाही.

एवढे वर्षे त्यांनी नगर जिल्ह्यावर अन्याय केला व आज दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्ह्याला हक्काचे पाणी येऊ न देणे व यासाठी आम्ही असं करु तसं करु ही त्यांची भूमिका काही योग्य नाही. तसेच ते ज्या पक्षात आहेत, आता त्यांच्याच पक्षातील त्यांचे नगरचे लोकप्रतिनिधी त्यांच्याविरोधात काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वळसे पाटलांचा सरकारला इशारा
नगरचे भाजपचे मंत्री कुकडीचे पाणी पळवत आहेत. मात्र या पाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करायला तयार आहोत. तसेच वेळप्रसंगी आम्हाला पोलीस प्रशासनाने अटक केली व छाताडावर गोळ्या जरी झाडल्या तरी आता आम्ही मागे हटणार नाही, अशा शब्दात वळसे पाटील यांनी कुकडी पाणी प्रश्नावरुन सरकारला इशारा दिला आहे.

Tags

follow us