अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातील ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट शाळा शिक्षकांविनाच भरल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकांसह विविध कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याची माहिती शिक्षकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ही शाळा शिक्षकांविनाच भरली असल्याचं दिसून येत आहे.
मोठा निर्णय : एक देश, एक निवडणुकीसाठी समितीची स्थापना; माजी राष्ट्रपती असणार अध्यक्ष
शहरातील सावेडी भागातील ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कूलमधील शिक्षक व कर्मचारी यांनी आज संपाची हाक दिली आहे. मागील अनेक वर्षापासून येथील कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे पगार देण्यात येत नाही, या शिवाय कर्मचाऱ्यांचे नौकरी संबंधित महत्वाचे दस्तावेज देण्यात आलेले नाही. तसेच सर्व्हिस बुक, पे स्लीप, अपॉईटमेन्ट ऑर्डर, कर्मचाऱ्यांची शासनाकडून घेतलेली मान्यतेचा दस्ताऐवज शाळा प्रशासन शिक्षकांना देत नसल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आज पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
INDIA आघाडी अजेंडालेस, मोदींना मनातून काढू शकत नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
शालेय प्रशासनांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप करून शाळेच्या बाहेरील आवारात शिक्षकांनी निदर्शने करून संप पुकारला आहे. यात ऑक्झिलीयम कॉन्व्हेन्ट स्कुलमधील शिक्षक माया मकासरे, गुरुशिल सोही, सुहास करंडे, भाऊसाहेब काळदाते, अंजली भिंगारदिवे,सांगुना टाकवले, अंजली भिंगारदिवे, गॅसपर बनसोडे, गोविंद कांडेकर, विजय पठारे, निर्मला पारखे, जोनिता गायकवाड, क्रांती पघडमल, रामप्यारी जाट, यामिनी आपटे, जया भाटिया, पौर्णिमा सोनवणे, शिल्पा शिंदे, श्याम लोंढे, स्नेहल खांत, कांचन धीवर, विशाखा फिलिप, सगुना ताकवले, शांती नेरो, रचना गायकवाड, मयूर टेमक, अर्चना लोखंडे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही, यासाठी शाळा प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलून शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात यावे व सदर संपास शिक्षक संघटनेने देखील पाठिंबा दर्शविलेला आहे. सदर संपाबाबत शालेय प्रशासनाशी सामाजिक पदाधिकाऱ्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता शाळा प्रशासनाने बोलण्यास नकार दिला आहे.
