Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
Government Schemes : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजेनेचा लाभ कसा घ्याल?
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर नगर शहरातील नेप्ती चौकाजवळ सीना नदीवर हा नवा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याचा येथील पूल जुना झाला आहे. तेसच तो उंच नसल्याने पावसाळ्यात सीना नदी पुराचे पाणी या पुलावर येते. परिणामी नगर-कल्याण महामार्ग वाहतूक ठप्प होते . तसेच या परिसरातील शिवाजीनगर, नालेगाव, भूषणनगर या भागातील शहरांतर्गत वाहतूकही विस्कळीत होते. या पार्श्वभूमीवर येथे नव्याने होणाऱ्या दुपदरी उंच पुलाने नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसह स्थानिक वाहतुकीचाही प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
सुजय विखे व संग्राम जगताप करणार भूमिपूजन
23 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता या सीना नदीवर होणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या पुलाचे उद्धाटन हे खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप हे करणार आहेत. या पुलाच्या कामाच्या निधीसाठी सुजय विखे आणि संग्राम जगताप यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन निधी मंजूर करण्यात आला आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिलराव शिंदे, महापौर रोहिणीताई शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Bageshwar Baba : तुकोबारायांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याची चूक लक्षात आली? बागेश्वर बाबा म्हणाले…
कल्याण-अहमदनगर-पाथर्डी-नांदेड-निर्मळ या 214.180 किमी राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 वरील सिना नदीवर जोड रस्ते व काँक्रिट गटारसह मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक योजना सन 2022-23लअंतर्गत रु. 27.16 कोटी रकमेस मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून पुलाच्या बांधकामात जोड रस्ते, संरक्षक भिंत, फुटपाथसह काँक्रिट गटार, पथदिवे,ठिकाणी संगमस्थान सुधारणा यातून पुलाचे सुशोभिकरणही होणार आहे.