Ahmednagar News : अहमदनगरमध्ये ( Ahmednagar) दोन्ही गटात राष्ट्रवादीच्या कार्यालयावरुन घमासान सुरू झाले आहे. यातच आता यामुळे नगरचे ( Ahmednagar) माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये (NCP) बंडाची ठिणगी पडली होती. यामधून अजित पवार गट व शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले. नेत्यांसोबत कार्यकर्ते देखील दुभागले गेले.
Subhedarसाठी नागराजने घेतला महत्त्वाचा पुढाकार; सिनेमाच्या पहिल्या दिवशी केली एवढी कमाई!
याबाबत अधिक माहिती अशी, नगर ( Ahmednagar ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनावर शरद पवार गटाने ताबा घेताच याबद्दल आक्षेप घेत अजित पवार गटाचे जिल्हा शहराध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी कार्यालयातील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या (अजित पवार गट) नामफलकांची तोडफोड केल्याचा आरोप करत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अजित पवार गटाच्या तक्रारीवर कोतवाली पोलिसांनी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Amitabh and Shahrukh : बिग बी अन् किंग खान 17 वर्षांनी येणार एकत्र, ‘या’ चित्रपटात दिसणार
दरम्यान शिवसेनेमध्ये यापूर्वी बंडाची ठिणगी पडली होती. त्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यावेळी कार्यकर्ते देखील विभागले गेले होते. व पक्षाची कार्यालये ताब्यात घेण्याच्या कारणावरून राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक देखील एकमेकांसोबत भिडले होते. आता याचीच पुनरावृत्ती नगर ( Ahmednagar ) शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
दरम्यान पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षात फूट का नाही, याचे शास्त्रीय कारण स्पष्ट केले.