Download App

Ahmednagar News : नगरच्या ढोल ताशांचा आवाज घुमणार साता समुद्रापार

Ahmednagar News : अमेरिकेत आवाज कुणाचा, नगरी ढोलाचा… यंदा देशासह परदेशात नगरी वाद्यांचा निनाद घुमणार आहे. येत्या गणेशोत्सवात तो ऐकायला मिळेल. विशेष म्हणजे वर्षभर डोळे लावून वाट पाहणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव होय. गणेशोत्सवाला काही दिवस उरले असून गणरायाच्या आगमनापूर्वीच त्याच्या उत्सवाची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पाला वाजत गाजत आणण्यासाठी पारंपारिक वाद्यांचे वादन केले जाते त्यामध्ये ढोल ताशाचा महत्त्वाचा समावेश असतो. हेच ढोल ताशांचा आवाज आता साता समुद्रापार घुमणार आहे.

Sunil Tatkare : राष्ट्रवादीत फूट पडली का ? खासदार सुनील तटकरेंचे थेट उत्तर…

ढोल म्हटले कि भारत आणि विशेषतः महाराष्ट्रची पारंपरिक संस्कृती आठवते. परंतु हेच ढोल-ताशे आता भारताबाहेरही दुमदुमु लागले आहेत. नगर येथील बापूराव भिकोबा गुरव यांच्या वाद्यांना सातासमुद्रापलीकडे मागणी आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षाला अमेरिकेतील कॅलिफॉर्निया प्रांतात मराठी बांधव ही वाद्य वाजवून गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता; CM शिंदेंनी उघडं पाडलं MVA चं पितळं

ढोल ताशांसाठी अमेरिकेतून थेट महाराष्ट्रात चाचपणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांना अखेर नगर येथील वाद्ये आवडली. त्यामुळे त्यांनी तब्बल ४० ढोल, २० ताशे, १० झांजांच्या जोडाची ऑर्डर येथील गुरव फर्मला दिली आहे. सध्या वाद्य पाठविण्याचे काम सुरू असून येत्या पाच तारखेपर्यंत अमेरिकेमध्ये ही वाद्य पोहोचणार आहेत. या वाद्याबरोबरच नगरचे नाव थेट आता अमेरिकेत घुमणार आहे.

Tags

follow us