Download App

Ahmednagar News : राहुरीतील धर्मांतराचा मुद्दा थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी… मुंबईमध्ये होणार महत्वाची बैठक

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन मुलींना शिकवणीच्या नावाखाली एका शिक्षिकेने धर्मांतराकडे ढकलण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. मुलींना धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासोबतच नकार देणाऱ्या मुलींना धमकावलं जात होतं. याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी हा मुद्दा थेट विधान परिषदेत उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. यासाठी लाड यांनी थेट गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. तसेच याप्रश्नी मुंबईमध्ये गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याबैठकीला पोलीस अधिकारी, मंत्री यांना देखील बोलवण्यात आले आहे. अशी माहिती आमदार लाड यांनी दिली आहे. ( Ahmednagar News Rahuri conversion issue meeting with Home Minister Devendra Fadanvis)

तुफान डान्स अन् प्रचंड एनर्जी; ‘जिंदा बंदा’ म्हणत शाहरूखच्या ‘जवान’ चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

राहुरी तालुक्यातील उंबरे गावात शिकवणीच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आता विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत ठोस कारवाईची मागणी केली. दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. यासाठी आमदार लाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. तसेच याबैठकीसाठी नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, आमदार, मंत्री महोदय यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.

MLA Prasad Lad : जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला जशाच तसे उत्तर देऊ

अशा घटना घडू नये यासाठी आम्ही स्वतः राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत निवेदन दिले आहे. याबाबत एक महत्वाची बैठक घेण्यात यावी यासाठी सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. जिल्ह्यात शांतता राहावी व कोणताही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच जो हिंदुत्ववादाच्या विरोधात लढेल त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही लव्ह जिहाद अजिबात सहन करणार नाही. हा प्रश्न आमच्या आई-बहिणीचा आहे. अशा शब्दांत आमदार लाड यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

मी बाहेरचा आमदार नाही…
राहुरी तालुक्यात घडलेल्या धर्मांतराच्या घटनेवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले असल्याचे आरोप हिट आहे. तर जिल्हयाच्या बाहेरच्या आमदाराने विधान परिषदेत यामुद्द्यावर भाष्य केले. याबाबत विचारण्यात आले आता आमदार लाड म्हणाले, मी बाहेरचा आमदार नाही. विधान परिषदेचा आमदार असल्या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे. तसेच हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने मी याविषयावर आवाज उठवला आहे.

Tags

follow us