Download App

Crime : शेवगाव दुहेरी हत्याकांडांचे कनेक्शन थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये! 48 तासांत आरोपी गजाआड

Shevgaon Double Murder Case : संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या शेवगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या अवघ्या 48 तासांतच मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या हत्याकांड प्रकरणामध्ये एकूण आणखी किती जणांचा समावेश आहेत याचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. (Ahmednagar Police arrested accused of shevgaon double murder case)

शेवगाव शहरातील मारवाड गल्ली येथे शुक्रवार (दि. २४) पहाटे आडत व्यापारी गोपीकिशन बलदवा यांच्या घरावर धाडसी दरोडा पडला होता. यात बलदवा आणि त्यांच्या भावजयी पुष्पा बलदवा (वय ६०) यांची हत्या झाली. तर सुनिता गोपीकिशन बलदवा ह्या घटनेमध्ये जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते.

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार : भाजपने व्हिडिओ करून सांगितली दहा कारणे

या धक्कादायक घटनेने शेवगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आधी धार्मिक दंगल आणि त्यानंतर घडलेली ही घटना. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवारी शेवगाव शहरातील व्यवहार, दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आले होते. तर शनिवारी शेवगाव तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेची गंभीर्य ओळखून तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवली आणि या हत्याकांडातील आरोपीला ४८ तासांच्या आत अटक केली. या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. या तपासादरम्यान, पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे हत्याकांडातील आरोपीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी Riteish Deshmukh पोहोचला जामियात; सेटवरचा ‘तो’ लूक व्हायरल

जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली

Tags

follow us