Ahmednagar : राम शिंदेंच्या ट्विटमुळे राजकारण तापले, फडणवीसांच्या साक्षीने राष्ट्रवादीला धक्का ?

Ahmednagar : भाजप (BJP) नेते आ. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) […]

Ram Shinde Rohit Pawar

Ram Shinde Rohit Pawar

Ahmednagar : भाजप (BJP) नेते आ. राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. त्यामुळे नगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे.

राम शिंदेंनी काय ट्विट केले ?

कर्जत-जामखेड (जि.नगर) मधील इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आजी माजी पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश. आ. प्रा. राम शिंदे असे ट्विट त्यांनी केले आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार निवडून आल्यानंतर भाजपसह अन्य पक्षातील बऱ्याच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये आ. शिंदे यांच्या जवळचेही काही जण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता पुन्हा कोण भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू आहे. या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ट्विटमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Exit mobile version