Download App

‘ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान’

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

अहमदनगर: अहमदनगर डाक विभागामध्ये (Ahmednagar Post Office) पोस्ट ऑफिसच्या विविध योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या डाक कर्मचारी यांचा कौतुक सोहळा प्रजासत्ताक दिनी (Republic Day) झाला. ग्रामीण भागात कार्यरत असणार डाकसेवकांचे मोलाचे योगदान आहे, असा विश्वास डाकघर प्रवर अधीक्षक बी नंदा यांनी व्यक्त केला.

प्रवर अधीक्षक बी नंदा म्हणाल्या, पोस्ट विभागाच्या योजना जनसामान्यांनापर्यंत पोहचविण्यासाठी डाक कर्मचारी व ग्रामीण भागात कार्यरत असणारे ग्रामीण डाकसेवकांचे मोलाचे योगदान आहे. सरकारच्या विविध योजनेचा लाभ सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात,त्याच्याच माध्यमातून अल्पबचतीच्या विविध योजनेची नवीन खाते उघडण्याच्या मोहीमेत मोठे काम होत आहे. याप्रसंगी पुरस्कारप्राप्त महेश तामटे, पोस्टल संघटनेचे नेते संतोष यादव,आसिफ पठाण,अंबादास फुंदे, घनश्याम साहा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

केडगाव पोस्ट ऑफिसच्या शुभांगी मांडगे यांनी पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये तर अकोळनेर शाखा डाकघराचे बाळासाहेब सोनवणे, भोरवाडीचे रमेश घुले यांना सन्मानित करण्यात आले. यांच्यासह विभागातील पुरस्कार प्राप्ती तृप्ती जोशी, किशोर नेमाने, प्रमिला कासार, संजय कदम, अमोल साबळे, नितीन खेडकर, जाकीर शेख, महेश सदाफुले, आर. ए. पडळकर, संजय बोदर्डे, अनिल मरकड ,प्रवीण कोल्हे, अनिल लोटके,अंबादास फुंदे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स अभिकर्ते निता ढाकणे, मंजुषा खरात, राजकुमार मांडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बनकर, प्रास्ताविक श्री संदिप हदगल,तर आभार प्रदर्शन श्री संजय बोदर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप सूर्यवंशी,संतोष घुले, तान्हाजी सूर्यवंशी,सागर पंचारिया,सुनिल भागवत, प्रफुल्ल काळे,ऋषीकेश कार्ले, सागर पंचारिया यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

follow us

वेब स्टोरीज