Ahmednagar चा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार’

अहमदनगर : अहमदनगर शहरातील वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लीटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षांची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने टाकीची दुरुस्ती केली. त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. पाणी प्रश्न मार्गी लागणार फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत. नगर […]

Untitled Design (1)

Untitled Design (1)

अहमदनगर : अहमदनगर शहरातील वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लीटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. अनेक वर्षांची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. तातडीने टाकीची दुरुस्ती केली. त्यामुळे संपूर्ण नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

पाणी प्रश्न मार्गी लागणार

फेज टू योजनेमधील विविध भागातील टाक्या कार्यान्वित होणार आहेत. नगर शहराचा अनेक वर्षांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. वसंत टेकडी येथील जुन्या ६८ लाख लीटर पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, डॉ. सागर बोरुडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version