धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Ahmedngar Youth kidnapped three girls : राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एका वीस वर्षीय तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत […]

धक्कादायक ! तरुणाकडून गावातील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Crime

Ahmedngar Youth kidnapped three girls : राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांना वाममार्गाला लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका गावातील तीन अल्पवयीन मुलींना एका वीस वर्षीय तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. तर एकाच वेळी तीन मुलींना पळवून नेण्यात आल्याने ग्रामस्थ हे चिंतेत आहेत.

देवेंद्र फडणवीसांना धक्का, फलटणमध्ये बदलली राजकीय समीकरणे, मोहिते पाटलांसाठी निंबाळकर कुटुंबीयांचा मोठा निर्णय

सातवी आणि आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन सख्या बहिणी, तर गावातील एक बारा वर्षाची अशा तीन मुली या आरोपीने मोटारसायकलवरून पळवून नेल्या आहेत. दोन मुलीचे वडिल हे तीन दिवसांपूर्वी साखरपुड्यासाठी दुसऱ्या गावाला गेले होते. त्यावेळी गावातील एका वीस वर्षीय तरुणाने तिन्ही मुलींना पळवून नेले. हा आरोपी करंजी घाटातून मोटारसायकलवरून घेऊन जात होत्या. त्यावेळी तिन्ही मुली जोर जोराने ओरडत होत्या. ही घटना गावातील एका व्यक्तीने बघितली. परंतु आरोपीने मार्ग बदलून अहमदनगरकडे निघून गेल्या.

मोहिते पाटलांनी माढा ‘ओढत’ आणलं… आता कोण-कोण आहे सोबत?

दोन मुलीच्या वडिलांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घरी असलेल्या मोठ्या मुलीला फोन करून याबाबत विचारणा केली. दोन सख्या बहिणी व गावातील एक मुलगी या तिघांना गावातील तरुण घेऊन गेला आहे. तो गावातील पाटलाच्या घरी सुवासिनी जेवण आहे, असे म्हणून तिघीला घेऊन गेल्याचे मुलीने सांगितले. त्यामुळे मुलीचे वडिल हे घरी आले. त्यांनी मुलींचा गावात शोध घेतला. परंतु तिन्ही मुली मिळून आल्या नाहीत. त्यानंतर वडिलांनी शेवगाव पोलिस ठाण्यात गावातील तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.

Exit mobile version